आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:धरणगावात गुरे मोकाट सोडणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी

धरणगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांच्या मालकांवर कारवाई करण्यासंदर्भात येथील शिवराणा ग्रुपतर्फे निवेदन देण्यात आले. सध्या लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे गावात व परिसरात गोवंशावर संकट निर्माण झाले आहे. अशा स्थितीतही धरणगावातील अनेक पशुपालकांनी आपली गुरे मोकाट सोडून जबाबदारी झटकली आहे. लसीकरण न झाल्यामुळे अनेक गायी, वासरे व पशुधनाचा दुर्दैवी अंत होत आहे.

मोकाट गुरांपैकी काही गुरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यामुळे या गुरांमुळे आजाराचा फैलाव वाढण्याचा धोका आहे. लम्पीमुळे मोकाट गुरे दगावल्यास संबंधित पशुपालक त्या गुरांवर अंत्यसंस्कारासाठीही पुढे येत नाहीत. त्यामुळे मोकाट गुरांच्या मालकांवर कारवाई करावी, पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे, यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली.

यासंदर्भात मुख्याधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले. याप्रसंगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पी.व्ही.सोनोने, न.पा. कार्यालय अधीक्षक संजय मिसर, तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना शिवराणा ग्रुपचे जितेंद्र पाटील, प्रथम सूर्यवंशी, पी.डी.पाटील, अॅड. हर्षल चव्हाण, आकाश तिवारी, संजय ओस्तवाल, पंकज पाटील, राहुल पाटील, पप्पू पाटील, भावेश झुंजारराव, दिनेश भदाणे, विक्रम पाटील, नामदेव मराठे यांनी निवेदन दिले. प्रशासनाने लम्पी आजाराचा शहरातील प्रसार रोखण्यासाठी, त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...