आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माघारीकडे लक्ष:राष्ट्रीय शिक्षण संस्थेत सात जणांचे अर्ज अवैध ; 182 पैकी 137 अर्ज वैध

चाळीसगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत १९ जागांसाठी तब्बल १८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शुक्रवारी या अर्जांची छाननी झाली. सोमवारी छाननीअंती उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात सात जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. आता १३७ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

छाननीत सर्वसाधारण गटातून दूध संघाचे संचालक प्रमोद पांडुरंग पाटील, बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र चुडामण पाटील, माजी मुख्याध्यापक सी.सी. वाणी, ग.स. सोसायटीचे संचालक अजय गोपाळराव देशमुख या ५ जणंाचे अर्ज बाद झाले. त्यात प्रमोद पाटील, रवींद्र पाटील यांनी संस्था प्रतिनिधी म्हणून अर्ज दाखल केल. त्या संस्था नसल्याने तर वाणी यांचा अर्ज प्रतिज्ञापत्रावर सही नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरले. तर अजय देशमुख हे संस्थेचे कर्मचारी असल्याने त्यांचा अर्जही अवैध ठरवण्यात आला.

आता सर्वसाधारण गटाच्या १४ जागांसाठी ९० अर्ज राहीले आहेत. महिला राखीव गटात १८ अर्ज आलेले असून असून तेथे एकही अर्ज बाद झाला नाही. इमाव गटात १५ अर्ज दाखल असून तेथे रवींद्र चुडामण पाटील यांचा अर्ज अवैध ठरला. अनु. जाती जमाती गटात ६ अर्ज होते. त्यात मिलिंद जाधव संस्थेचे सभासद नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. तर वि.जा.भ.ज व विशेष मागास प्रवर्ग गटात १० अर्ज दाखल केले होते. त्यात विठ्ठल अंबादास शिंगाडे यांचा अर्ज अवैध ठरला.

१८ डिसेंबरला मतदान
छाननीनंतर आता माघारीकडे लक्ष लागलेे आहे. माघारीची मुदत ५ डिसेंबरपर्यंत आहे. या काळात पॅनलची जुळवाजुळव होऊन ५ डिसेंबरला लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. तर ६ डिसेंबरला चिन्ह वाटप होऊन अंतिम यादी प्रसिद्ध होईल. मतदान १८ डिसेंबरला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होईल. मतमोजणी १९ रोजी होईल.

बातम्या आणखी आहेत...