आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी घटना:सांगवी येथे सिलिंडरच्या स्फोटात ऊसतोड करणाऱ्या मजुराच्या संसाराची राखरांगाेळी; बैलांची विक्री केलेली एक लाखाची रोकड खाक; वस्तूंसह दागिनेही खाक

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उसतोड करून नुकतेच गावी परतलेल्या सांगवी येथील मजुराचे घर सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले. यात बैल विक्रीतून आलेले एक लाख रूपये तसेच धान्य व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यात त्यांचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले असून यामुळे मजुराचा संसार उघड्यावर आला आहे.

सांगवी येथील ऊसतोड मजूर दामू फंदू राठोड हे तीन ते चार दिवसांपूर्वी साखर कारखान्यावरून ऊसतोड करून कुटुंबासह गावी परतले होते. बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी घरात स्वयंपाक करत असताना अचानक गॅस सिलिंडर लीक होवून स्फोट झाला. या वेळी लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले.

दरम्यान, या आगीमुळे शेजारील धनंजय ठाकरे यांच्या घराचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घराला आग लागल्याचे कळताच नागरिकांनी धाव घेत मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. चाळीसगाव पालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर आग आटोक्यात आली. या आगीमुळे दामू राठोड यांचा परिवार उघड्यावर आला आहे. तलाठी, ग्रामसेवक यांनी पाहणी करून आगीच्या घटनेचा पंचनामा केला, अशी माहिती सरपंच महेंद्र राठोड यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...