आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षानिमित्त उपक्रम:भक्तिगीतांच्या सुरात श्रोते झाले तल्लीन; कार्यक्रमाला भाविकांची अलोट गर्दी

पारोळा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पारोळा येथे बालाजी महाराज मंदिरात छपन्नभोग

शहराचे आराध्य दैवत प्रती तिरुपती श्री बालाजी महाराजांच्या मंदिरात गुढीपाडवा, नववर्षानिमित्त छपन्न भोग या नैवेद्याच्या कार्यक्रमाला भाविकांनी अलोट गर्दी झाली होती. तर रात्री सुमधुर भक्ती गीतांच्या स्वरात श्रोते तल्लीन झाले होते. श्री बालाजी संस्थान व व्यंकटेश बालाजी महाप्रसाद समितीच्या संयुक्त विद्यमानाने मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच गुढीपाडवा तसेच नूतन मराठी नववर्षानिमित्त छपन्नभोग कार्यक्रम घेण्यात आला. २ एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातून जवळपास दोनशे भाविकांनी स्वयंस्फूर्तीने दिलेला छपन्न भोगचे आयोजन केले होते. बालाजी महाराजांच्या अभिषेकानंतर दुपारी १२ वाजता मंदिराचे मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी, विश्वस्त डॉ. अनिल गुजराथी, दिलीप शिरूडकर यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत संकल्प सोडण्यात आला. त्यानंतर भाविकांसाठी छपन्नभोग दर्शन खुले झाले. रात्री १०.३० वाजता शेज आरती करून छपन्न भोगचा गोपाळ काला करण्यात आला. ३ एप्रिलला हा काला मंदिरात प्रसाद स्वरूपात वाटण्यात आला. या वेळी भाविकांसह विशेषतः महिलांची सर्वाधिक गर्दी होती.

भक्तिगीतात श्रोते तल्लीन
छपन्न भोगनिमित्त गुढीपाडव्याला रात्री ७ वाजता जळगाव येथील सुनंदा चौधरी यांचा श्रीहरी भक्ती संगीत मंडळाचा सुमधूर भक्ति गीतांचा कार्यक्रम झाला. यात विविध भक्ति गीते, श्री बालाजी गीतांमध्ये उपस्थित श्रोते तल्लीन होऊन नृत्य करताना दिसून आले.

यांचे मिळाले सहकार्य
व्यंकटेश महाप्रसाद समितीचे अध्यक्ष ए. टी. पाटील यांच्या मार्गदर्शनात अॅड. दत्ताजी महाजन, प्रकाश शिंपी, दिनेश गुजराथी, विश्वास चौधरी, रमेश भगवती, अमोल वाणी, बापू कुंभार, गुणवंत पाटील, प्रमोद वाणी, गुणवंत चौधरी, सोनू चौधरी, सारिका शिंपी, अॅड. कृतिका आफ्रे व स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...