आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकस्मात मृत्यूची नोंद:देवळी शिवारात आढळला बिहारच्या वृद्धाचा मृतदेह

चाळीसगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील देवळी-चिंचखेडे शिवारात मंगळवारी सकाळी एका विहीरीत वृद्धाचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. घटनास्थळी मेहुणबारे पोलीसांनी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढून, शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात नेला. मृताची ओळख पटली असून तो बिहार राज्यातील रहिवासी आहे.

देवळी-चिंचखेडे शिवारात शिवाजी पाटील यांच्या शेतात सकाळी मजुर काम करत असताना, त्यांना विहीरीत मृतदेह तरंगताना आढळून आला. शेतकऱ्यांसह शेतमजुरांची विहीरीकडे धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिस पाटलांनी पोलिसांना कळवली. पोलिस नाईक गोरख चकोर यांनी विहीरीत उतरून दोरीच्या सहाय्याने खाटेवर मृतदेह टाकून तो विहीरीबाहेर काढला. पोलिसांना मृताच्या खिशात आधारकार्ड आढळून आले. त्या आधारे मृतकाचे नाव लाल बहादूर रॉय (वय ७४) असल्याचे स्पष्ट झाले.

खिशात रेल्वेचे तिकीट
मृत रॉय यांच्या खिशात पोलिसांना २९ जुलैचे छपरा ते नाशिकचे रेल्वेतिकीट आढळले. ते देवळी शिवारात का आले? याचा पोलिस तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...