आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:वाडे गावात धावणार बस, उपोषण मागे ; ग्रामस्थांना आगार प्रमुखांनी दिले पत्र

भडगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बंद असलेली भडगाव ते वाडे, जळगाव ते वाडे मुक्कामी बससेवा त्वरीत सुरू करावी. तसेच ग्रामीण भागातील बंद असलेल्या बसफेऱ्या सुरु कराव्या, या मागणीसाठी ग्रामस्थांनी ७ रोजी तहसीलसमोर उपोषण सुरु केले होते. पाचोरा आगार प्रमुख निलिमा बागूल यांनी बससेवा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले. त्यामुळे एसटीच्या संपानंतर प्रथमच वाडे गावात बस जाणार आहे. पाचोरा-नंदुरबार या बसद्वारे शिंदखेडा तालुक्यातील मेथी तसेच परिसरातील गावात अनेक प्रवासी पाचोरा, भडगावातून जातात. मात्र, मेथी येथे बसला थांबा नसल्याने प्रवाशांना चिमठाणे किंवा दोंडाईचा येथे उतरावे लागते. तेथून मेथी या गावी जावे लागते. या मुळे प्रवाशांचे मोठे हाल होतात. म्हणून पाचोरा-नंदुरबार या बसला मेथी या गावी थांबा मिळवा असे निवेदन शिवदास महाजन यांनी पाचोरा आगार प्रमुख निलिमा बागुल यांना दिले. त्यावर तात्काळ तोडगा काढत प्रवाशांचे हाल नको म्हणून नीलिमा बागुल यांनी कार्यालयात फोन करून तात्काळ बसला मेथी येथे थांबा समाविष्ट करावा, अशा सूचना दिल्या. अशोक परदेशी, आण्णा मोरे, नरेंद्र पाटील उपस्थित होते. जागेवर समस्या सुटल्याने प्रवाशांना समाधान व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...