आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रा.पं.निवडणूक:अमळनेरातील 12 जणांचे उमेदवारी अर्ज छाननीत बाद, माघारीकडे लक्ष

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापले आहे. सोमवारी दाखल झालेल्या अर्जांची तहसीलमध्ये छाननी झाली. छाननीत १२ जणांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी ११४ तर सदस्य पदासाठी ४४८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी सदस्य पदासाठीचे १२ उमेदवारी अर्ज आज छाननीत बाद झाले असून, ४३६ उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. त्यात वावडे १, मारवड ३, चोपडाई ३, नगाव खुर्द ३, इंद्रापिंप्री २ असे १२ अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. विविध कागदपत्रांची अपूर्णता यासह अन्य तांत्रिक चुकांमुळे संबंधितांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. आता ७ रोजी होणाऱ्या माघारीकडे लक्ष लागले असून, त्यानंतर ग्रामपंचायतींच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माघारीबाबत ग्रामीण भागात उत्सुकता आहे.

तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सरपंच पदासाठी ९८ तर सदस्य पदांसाठी तब्बल ४९९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी ५ रोजी दाखल नामनिर्देशन पत्रांची तहसील कार्यालयात छाननी करण्यात आली. छाननीत केवळ उंबरखेड येथील सदस्य पदाचा एक अर्ज बाद झाल्याची माहिती तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली. तर सरपंच पदासाठी ९७ व सदस्य पदाचे तब्बल ४९८ उमेदवारी अर्ज वैध ठरले.

ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. या अर्जांची सोमवारी तहसीलदार अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनात व नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांच्या देखरेखीत छाननी करण्यात आली. छाननीत उंबरखेड ग्रामपंचायतीतील सदस्यपदाचा १ अर्ज अवैध ठरविण्यात आला. सरपंच पदाच्या १६ जागांसाठी ९७ व सदस्यपदाच्या १५४ जागांसाठी ४९८ असे ५९५ उमेदवारी अर्ज वैध ठरले. आता माघारीकडे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...