आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तापीतील कच्चा रस्ता वाहिल्याने प्रवाशांचे हाल; खेडीभोकरी ते भोकर दरम्यान वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी कायमस्वरूपी पुलाची मागणी

चोपडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेडीभोकरी ते भोकर दरम्यान तापी नदीत माती, मुरूम, पाइप टाकून तयार केलेला कच्चा रस्ता गुळी नदीला सोडलेल्या आवर्तनामुळे वाहून गेल्याने या मार्गावरील प्रवाशांसह लहान, मोठ्या वाहनधारकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे हंगामी लाकडी पूल तयार केला असता तर हा त्रास झाला नसता. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा पूल कसा चांगला बनवता येईल आणि वेळेत प्रवाशांची सोय करता येईल, याकडे लक्ष देण्याची मागणी जळगाव व चोपडा तालुक्यातील प्रवाशांनी केली आहे.

गुळी नदीत कालच पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. कोळंबा येथील अवधूत बाबा मंदिरापासून पाण्याचा प्रवाह तापी नदीच्या विरुद्ध दिशेने भोकर, भादली पर्यंत जातो. तिकडे पातळी पूर्ण झाल्यानंतरच खालील कठोरा, पळसोदकडे पाणी वाहते. प्रवाह जोरात असल्यामुळे कच्चा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे खेडी-भोकरी जाणारे लहान, मोठे चारचाकी वाहनांना ऐनवेळेस अडावद, धानोरा मार्गे जळगाव तसेच भोकर कडील वाहनांना विदगाव मार्गे चोपडा असे फिरून जावे लागत आहे. हंगामी लाकडी पूल असता तर वाहनधारकांना त्रास झाला नसता, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...