आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील लोहारी बुद्रुक येथे बडगुजर समाज, चामुंडा माता, अखिल भारतीय बडगुजर समाजाच्या महाअधिवेशनाची सुरुवात धर्माचार्य महंत वाचस्पती महामंडलेश्वर योगिराज दयानंद महाराज शेलगावकर. गजानन जोशी यांच्या हस्ते शनिवारी ग्रंथ पूजन व नगरप्रदक्षिणेने झाली.
ग्रंथ दिंडी व नगर-प्रदक्षिणेत मोठ्या संख्येने महिला, युवक, युवती व समाजबांधव सहभागी झाले होते. महंत दयानंद महाराज यांचे स्वागत अधिवेशनाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय बडगुजर समाज महा-समितीचे माजी अध्यक्ष उमेश करोडपती यांनी केले. दीप प्रज्वलन मुंबई येथील उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष बापू बडगुजर तर प्रतिमा पूजन नाशिक येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले.
(बऱ्हाणपूर), मनोहर बडगुजर (धुळे), राजाराम बडगुजर (अमळनेर), अशोक बडगुजर (धुळे), एस. एम. बडगुजर (डोंबिवली) आदी उपस्थित होते. लोहारी बुद्रुक येथे महा-अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समाजातील शेतकरी, दुर्लक्षित विवाह समस्या, महिला संघटन व सक्षमीकरण, समाजातील घटस्फोटाची विदारक समस्या, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना रोजगाराकडे वळवणे, तर दुपारच्या सत्रात शैक्षणिक प्रगती, योग्य मार्गदर्शन काळाची गरज, तालुका स्तरावर वैद्यकीय प्रतिनिधी नेमणे, ओबीसी आरक्षण विकासाची गुरुकिल्ली या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. महा-अधिवेशनास स्थानिक पदाधिकारी चिंधा बडगुजर, श्रावण बडगुजर, दिनकर बडगुजर, हिरामण बडगुजर, लालचंद बडगुजर, भास्कर बडगुजर, युवराज बडगुजर, रवींद्र बडगुजर, कडूबा बडगुजर, बापू बडगुजर यांनी सहकार्य केले.
आज मुख्यमंत्र्यांची राहणार उपस्थिती
रविवारी हाेणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे गुजरात येथील प्रदेशाध्यक्ष तथा खासदार आर. सी. पाटील, उमेश करोडपती, आनंदा सूर्यवंशी, अहमदाबाद येथील उद्योजक कैलास बडगूजर हे करतील. सभामंडपाचे भूमिपूजन आमदार किशोर पाटील, स्मरणिकेचे प्रकाशन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गो शाळेचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हाेईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.