आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौघांवर गुन्हा:मृत व्यक्तीची जमीन दुसऱ्याच्या नावे; तलाठी, सर्कलसह चौघांवर गुन्हा ; पहुर पोलिस ठाण्यात फिर्याद

शेंदुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मृत व्यक्तीची जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याप्रकरणी शेंदुर्णी येथील तलाठी, सर्कल व इतर दोन व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेंदुर्णी येथील वाडी दरवाजा भागातील रहिवासी व शेतकरी जिजाबाई देविदास माळी (वय ५५) यांनी या संदर्भात पहुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, त्यांचे पती देविदास गोविंदा माळी यांचे २८ एप्रिल २०२१ रोजी दीर्घ आजारामुळे निधन झाले. पतीच्या मृत्युनंतर त्यांनी ई-सेवा केंद्रावर जाऊन मृत देविदास माळी यांच्या नावे असलेला उतारा काढला. त्यात मृत पतीसह जनाबाई गेविंदा माळी यांच्या नावाचा सामाईक उतारा मिळाला. हे पाहून जिजाबाई यांनी त्यांचा भाचा आक्रोश माळी, आनंदा माळी यांना याबद्दल माहिती दिली. यानंतर त्यांनी तलाठ्याकडे धाव घेतली असता या जमिनीचे न्यायालयात वाद असल्याचे सांगितले होते. या प्रकरणी जिजाबाई माळी यांच्या फिर्यादीवरुन अफरातफर करुन फसवणूक केल्याप्रकरणी तलाठी शांतीलाल नाईक व मंडळ अधिकारी हर्षल विश्वनाथ पाटील यांच्यासह जनाबाई माळी व अन्य एकावर पहूर पोलिसांत गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे व सहकारी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...