आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:नेरीत पीक पाहणीचा घेतला जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा

रोटवदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पी. एम. किसान ई-केवायसी याबाबत नेरी बुद्रुक येथील आपले सरकार ई-सेवा केंद्राला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. या प्रसंगी तहसीलदार अरुण शेवाळे, निवासी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर, मंडळ अधिकारी हर्षल पाटील, तलाठी ए. ए. ठाकूर, ई-सेवा केंद्राचे चालक सचिन शेळके तथा लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, केकतनिंभोरा येथे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन ई-पीक पाहणी करून पाहिली. या संदर्भात येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्या पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. या वेळी निवासी नायब तहसीलदार प्रशांत निबोळकर, मंडळ अधिकारी विनोद पाटील, कोतवाल तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...