आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद:वर्गप्रमुख निवडताना घेतला निवडणुकीचा अनुभव

भडगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजचा विद्यार्थी उद्याचा प्रगत भारताचा मतदार असेल म्हणून विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कळावी, यासाठी वर्गातील वर्ग प्रमुख नेमण्यासाठी निवडणूक आयोग प्रमाने निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल दिसून आले.सद्या राज्याच्या राजकारणात जशी दररोज नवीन समीकरण समोर येत आहे. वातावरण तापले असून राजकारणाचा विषय ढवळून निघाला आहे. ग्रामीण भागात ही राजकारणाविषयी उत्सुकता वाढली आहे. मात्र, आपण पवित्र मतदार कसे होतो व मतदान कसे करतो, राजकारण व निवडणूक कशी रंगते याचा प्रत्यक्ष अनुभव आमडदे येथील साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दहावीचा वर्ग प्रमुख निवडणुकीत घेतला.

दरम्यान, निवडणुकीत आपल्याला काय करावे लागेल, आपला नेता कोण, कोणता पक्ष, चिन्ह काय हवे, मत कसे मागायचे, मतदार संघात काय आश्वासने व कामे होतील, मतदार कसे मते देतील, यासह निवडणूक निर्णय अधिकारी, केंद्र प्रमुख, पोलिस, मतदार आदी सर्व जबाबदारी विद्यार्थ्यांनी समजून घेऊन तशाच पद्धतीने पार पाडली. यामुळे हे मतदार भविष्यात ही चांगल्या प्रकारे मतदान करतील.

निवडणुकीत सचिन अन‌् माधुरीचा विजय
तालुक्यातील आमडदे येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचालित साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या तुकडी ब या वर्गाची लोकशाही पद्धतीने वर्ग प्रमुख या पदाची वर्गातील निवडणूक २८ रोजी घेण्यात आली. यात प्रामुख्याने युवकांमध्ये सचिन पाटील (धनुष्य) तर मुलींमध्ये (कमळ फुल) माधुरी पाटील हे विद्यार्थी विजयी होऊन वर्ग प्रमुख झाले आहेत.

माेबाइलचा केला उपयाेग
या निवडणुकीत मोबाइल फोनचा उपयोग इव्हीएम मशीन म्हणून करण्यात आला. तसेच निवडणुकीत मतदान अधिकारी, पोलिस कर्मचारी, उमेदवार प्रतिनिधी ही पदे विद्यार्थ्यांनीच भूषवून सर्व निवडणूक प्रकिया स्वतः पार पाडली. निवडणूक प्रक्रियेचे उद्घाटन प्राचार्य आर. आर. वळखंडे यांनी केले. त्यांच्यासमवेत पर्यवेक्षक एस. पी. पाटील उपस्थित होते. सर्व निवडणूक प्रक्रियेत वर्गशिक्षक डी. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. वर्गाच्या एकूण मतदानापैकी ८८.१३ टक्के मतदान झाले.

बातम्या आणखी आहेत...