आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र शासन कोळसा पुरवत नाही. राज्य शासनाकडूनही खात्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद नाही. तरीही आम्ही २४ बाय ७ वीजपुरवठा करत असल्याचे मत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जामनेर येथे व्यक्त केले. महिला आयोगाच्या माजी सदस्या ज्योत्स्ना विसपुते यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वीज उत्पादनासाठी कोळसा घ्यावा लागतो, लाखो कर्मचाऱ्यांना पगार द्यावा लागतो. वेळप्रसंगी जादा दराने वीज घ्यावी लागते. आज १७ राज्यांमध्ये वीजटंचाई आहे. त्यातही महाराष्ट्राची परिस्थिती चांगली असून अधिक सुविधेसाठी ग्राहकांनी वीज बिलांचा नियमीत भरणा करावा, अशी हात जोडून राऊत यांनी विनंती केली. राज्यातील सर्व प्रकल्प कार्यान्वित असून आम्ही २४ बाय ७ वीजपुरवठा करत आहोत. इतर ठिकाणी आधी पैसे दिल्यानंतर सुविधा मिळते.
मात्र, आम्ही आधी वीज देतो, नंतर बिल देतो. सुविधा पुरवून ही नागरिक वीज बिल भरत नाहीत. हे योग्य नसून आपल्या सोईसाठी ग्राहकांनी वीजबिल भरलेच पाहिजे, असेही राऊत म्हणाले. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, अविनाश भालेराव, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी, शंकर राजपूत उपस्थित होते. या वेळी ज्योत्स्ना विसपुतेचा यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.