आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबुली:सासऱ्यानेच सुनेचा गळा दाबून केला खून; स्वत:च दिली कबुली

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कौटुंबिक वादाच्या कारणातून सासऱ्यानेच हाताने सुनेचा गळा व तोंड, नाक दाबून जीवे ठार मारल्याची घटना प्रकार शहरालगत असलेल्या टाकळी प्र.चा. येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. सुनेचा खून केल्यानंतर सासऱ्याने स्वत:हून शहर पोलिस ठाणे गाठत याबाबत कबुली दिली. या घटनेने टाकळी परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या घटनेत सासऱ्यानेच खुनाची तक्रार दिली आणि आरोपीही ताेच निघाला.

टाकळी प्र.चा. येथील शिवशक्ती नगरातील रहिवासी उत्तम पुंजाजी चौधरी (वय ६५) यांनी फिर्याद दिली. पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा त्यांचा परिवार असून त्यांचा मुलगा गोकुळ चौधरी हा खाजगी क्लास चालवतो. सून कविता चौधरी (वय २५) हिचे माहेर शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील असून तिच्या सासरच्या लोकांशी तीन वर्षांपासून वाद आहे. या कौटुंबिक वादामुळे गराेदर असलेली कविता सहा महिन्यांपासून माहेरी राहत होती. ३ जुलै रोजी कविताने कन्येस जन्म दिला. नातीला पाहण्यासाठी उत्तम चौधरी पत्नी व मुलगा यांच्यासह टेकवाडे येथे गेले. मात्र कविताने मुलगा अन्वीक यास सासू, सासरे व पती यांना भेटू दिले नाही.

सून वाईट बाेलल्याने आला राग
२९ सप्टेंबर रोजी पती गोकुळ कवितास आणण्यासाठी टेकवाडे येथे गेला. रात्री ९ वाजता ते मुलांसह चाळीसगावला आले. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उत्तम चौधरी घरी आले. त्यांनी सून कवितास चहा करण्यास सांगितले. चौधरी चहा घेत टीव्ही पाहत असताना सायंकाळी ५.३० वाजता कविता आली व तिने टीव्ही बंद करून तुम्हाला येथे बसून लाज वाटत नाही का, असे बोलली. त्याचा चौधरी यांना राग आला. ते तिच्या मागोमाग बेडरूममध्ये गेले. कवितास बेडवर ढकलून दोन्ही हातांनी तिचा गळा, नाक व तोंड दाबून तिला जीवे ठार मारले.

चार दिवसांची काेठडी
सासरे उत्तम चाैधरी स्वत:च रिक्षातून शहर पाेलिस ठाण्यात गेले व त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सून कविता हिचे सोबत नेहमी होत असलेल्या कौटुंबिक वादाच्या कारणावरून मी तिला जीवे ठार मारल्याचे पाेलिसांना सांगितले. त्यानुसार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. शनिवारी न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली. तपास सपाेनि दीपक बिरारी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...