आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरी सुविधांना प्राधान्य:भुयारी गटारींचा पहिला टप्पा वर्षभरात होईल पूर्ण

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव गेल्या दाेन वर्षांपासून बहुचर्चित ६८ कोटी ४४ लाख खर्चाच्या भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम नवीन वर्षात पूर्ण होईल. शहरातील एकूण २२७ किमी लांबीच्या भुयारी गटारींसाठी १४४ कोटी, तर पहिल्या टप्प्यात ६८ कोटी ४४ लाखांचा खर्च होईल. पहिल्या टप्प्यात ८९ किमी व दुसऱ्या टप्प्यात १३८ किमी भुयारी गटारी होतील. शहरातील पुढील ३० वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून योजना तयार होत आहे. भुयारी गटार योजनेत शहराचे दोन भाग करण्यात आले असून दोन्ही भागासाठी स्वतंत्र सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प असे बांधकाम अभियंता प्रदीप धनके यांनी सांगितले.

पाराेळा : ५४ कोटींची नवीन पाणी योजना होणार पारोळा शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना १३ ते १४ दिवसांआड पाणी मिळते. हा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी शहरासाठी ५३ कोटी ६९ लाखांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. नवीन वर्षात या योजनेचे काम सुरू होईल. तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरणावरून ही योजना पाणी उचल करेल. निविदा प्रक्रिया पार पडली असून मुख्यमंत्र्यांची तारीख मिळताच भूमिपूजन होईल. या योजनेत धरण ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन पाइपलाइन, शहरातील सर्व जीर्ण पाइपलाइन बदलणे, दोन जलकुंभ होतील.

रेलनीर प्रकल्प : मार्चपासून पाणी बाटल्यांचे उत्पादन भुसावळ डिसेंबर २०१९ मध्ये सुरू होणे नियोजित असलेला रेल नीर प्रकल्प तीन वर्षे विलंबाने यंदा मार्च २०२३ पूर्वी सुरू होणार आहे. यामुळे रेल्वे स्थानकावर रेल नीर बाटलीबंद पाणी उपलब्ध होईल. इतर कंपन्यांच्या एका पाणी बाटलीवर २० रुपये खर्च करावे लागतात. रेलनीरची बाटली केवळ १५ रुपयांत मिळेल. म्हणजेच प्रवाशांचे प्रत्येक बाटलीमागे पाच रुपये वाचतील. लूट थांबेल. रेल्वेच्या आयआरसीटीसीने भुसावळ एमआयडीसीत सन २०१८मध्ये रेल नीर प्रकल्प मंजूर केला होता. २०२२ हे वर्ष संपूनही हा प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. परिणामी विभागातील रेल्वे स्थानकांवर अन्य कंपन्यांची पाणी बाटली २० रुपयांत विकत घ्यावी लागते. पण, एमआयडीसीत ८,५५३ स्क्वेअर फुटावरील हा प्रकल्प आता पूर्ण झाला असून तेथे आधुनिक मशिनरी बसवणे सुरू आहे. मार्चपूर्वी हा प्रकल्प कार्यान्वित होईल. तेथून २४ तासात ४० हजार पाण्याच्या बाटल्या तयार होऊन रेल्वे प्रवाशांना त्यांची विक्री होईल.

बातम्या आणखी आहेत...