आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावढोदे (ता.यावल) येथील निष्कलंक धाममध्ये सतपंथ चारिटेबल ट्रस्ट तथा अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवाराने आयोजित केलेल्या समरसता महाकुंभाचा शनिवारी समारोप झाला. या कार्यक्रमाला देशभरातील संतमहंतांसह हजारो भाविकांनी उपस्थिती दिली. या सर्व कार्यक्रमाची सांगता १ जानेवारीला सकाळी धर्माध्वजाची पूजा करून व तो सन्मानपूर्वक खाली उतरवून झाली. त्याचबरोबर भव्य सभामंडप व रसोई घरातील अग्नीची पूजा करून त्यांना शांत करण्यात आले.
१५ डिसेंबर २०२२ रोजी समरसता महाकुंभाच्या धर्माध्वजाची स्थापना संत-महंतांसह सर्व जाती धर्मातील नागरिकांच्या उपस्थितीत झाली होती. त्या दिवसापासून कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन महाराजांनी पायात पादत्राणे न घालता अनवाणी राहून सर्व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले. त्यांचा संकल्प पूर्णतः सिद्धीस गेला.
त्यामुळे ज्योत्स्ना ठोंबरे व महाराजांच्या मातोश्री यांच्या हस्ते पुरोहित रत्नपारखी महाराज यांच्या मंत्रोच्चारात विधिवत पाद्यपूजन करून पादत्राणे पायात घातली. यावेळी महाराजांसह सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते. यावेळी श्री राधे राधे बाबा, परमपूज्य अनिला आनंद महाराज, परमपूज्य सुरेशशास्त्री मानेकर बाबा, स्वामी भक्तीस्वरूपदास यांच्यासह अयोध्या येथील सुमारे ५५ त्यागी संत महंत, एकदंत महाराज प्रवीणभाई पटेल आदी उपस्थित होते. या वेळी भाविकांची माेठ्या संख्येने उपस्थित दिसून आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.