आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ मिनिटांचा घटनाक्रम:कारमधून आले चौघे, एटीएम मशीनला बांधला दोर, 17 लाखांसह यंत्रही नेले; चाळीसगाव पोलिसांना चोरट्यांचे खुले आव्हान

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रात्रीच्या गस्तीदरम्यान शहर पोलिसांच्या पथकाला निदर्शनास आला प्रकार

शहरालगतच्या टाकळी प्र. चा. भागातील खरजई रोडवरील स्वयंवर मंगल कार्यालयासमोर असलेले, स्टेट बँकेचे एटीएम कारमधून अालेल्या चोरट्यांनी पळवून नेले. मंगळवारी रात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. हे एटीएम भर रस्त्यावर आणि अत्यंत वर्दळीच्या भागात आहे. तरीही चोरट्यांनी काचेचा दरवाजा फोडून एटीएम लांबविले. रात्री गस्त घालणाऱ्या चाळीसगाव शहर पोलिसांच्या पथकाला ही घटना लक्षात आली. मंगळवारी दुपारी या एटीएममध्ये २० लाखांची रोकड भरली होती. त्यापैकी १७ लाख ५० हजारांची रोकड चोरट्यांच्या हाती लागली.

एटीएम मशीन लांबवणारे चोरटे सीसीटीव्हीत चित्रित झाले आहेत. रात्री २ वाजून २० मिनिटांनी पांढऱ्या इकाे कंपनीची कार एटीएमच्या बाहेर येते. कारमधून चार चाेरटे उतरतात. दाेन चाेरटे एटीएममध्ये प्रवेश करून एक जाडसर राेप एटीएम मशिनमध्ये अडकिवतात. त्यानंतर चाेरटे एटीमएम केंद्राचा काचेचा दरवाजा ताेडून, ४५० िकलाे वजनाचे डायबाेल्ट कंपनीचे एटीएम कारमध्ये टाकून अाठ मिनिटांमध्ये पसार होतात, असा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्याच्या आधारे तपास सुरू आहे.

आधी रेकी केल्याचा संशय
या घटनेपुर्वी चोरट्यांनी परिसराचे तसेच बँकेचे बारकाईने निरीक्षण केले असावे, त्यांना एटीएमचीही तांत्रिक माहिती होती, असा पोलिसांना संशय आहे. कारण घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर चोरट्यांनी अत्यंत सफाईदारपणे मोहीम फत्ते केली.

श्वान जागीच घुटमळले
घटनास्थळी काचांचा खच पडलेला हाेता. तसेच एटीएम केंद्राच्या बाहेर कारच्या टायरचे ठसे देखील पाेलिसांना िमळून अाले अाहेत. तसेच एटीएम केंद्रात एक लाेखंडी सळई देखील पाेलिसांना सापडली अाहे. जळगाव येथील जंजीर श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले हाेते. सीसीटीव्हीत कैद झालेल्या दाेघा चोरट्यांनी चेहरे व डाेके कपड्याने झाकलेले हाेते. तसेच हातात मोजे घातले होते. जंजीर श्वानाने एटीएम ते रस्त्या पर्यंतचा मार्ग दाखवला. त्यानंतर श्वान जागीच घुटमळले.

प्रथमच धाडसी चोरी
एटीएम मशिनमध्ये सर्व्हिस प्राेव्हायडर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दुपारी ४ वाजता २० लाख रुपयांची राेकड भरली हाेती. चोरट्यांनी एटीएम मशिन पळवले तेव्हा त्यात १७ लाख ५३ हजार ५०० रुपयांची राेकड हाेती. या धाडसी चोरीने पोलिसांना चोरट्यांनी एकप्रकारे आव्हानच दिले आहे. चाळीसगाव परिसरात आतापर्यंत एटीएम फोडून चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र एटीएम मशिन पळवण्याची ही पहिलीच घटना आहे. रात्री घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी परिसरात सर्च ऑपरेशन राबवले. काही दिवसांपुर्वी कारमधून आलेल्या भामट्यांनी भर वस्तीतील मेडीकल फोडल्याची घटना घडली होती.

एटीएम यंत्राच्या परिसरात मध्यरात्रीपर्यंत होती वर्दळ
शहरालगतचा टाकळी प्र.चा. भागातील खरजई रोड परिसरात कायम वर्दळ असते. खरजई, तरवाडे, न्हावे, टेकवाडे, बहाळ यासारख्या २० ते २५ गावातील नागरिक याच रस्त्याने ये-जा करतात. तसेच एटीएम पासून काही मीटरवर या भागातील तरूण रात्री १२ वाजेपर्यंत गप्पा मारत बसलेले होते. तर गाळा मालक भूषण पाटील रात्री ११ वाजेपर्यंत जागे होते. रात्री तीन वाजेच्या सुमारास गस्त घालताना चाळीसगाव शहर पोलिसांच्या पथकातील पाेलिस नाईक िवनाेद खैरनार यांना ही घटना समजली. त्यांनी गाळा मालकाला उठवून पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनाही ही घटना कळवली. घटनास्थळी ठाकुरवाड यांच्यासह डीवायएसपी कैलास गावडे, एपीआय विशाल टकले, निसार सय्यद यांनी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात अाला अाहे.

बातम्या आणखी आहेत...