आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:पालकमंत्र्यांनी प्रकाश तेली यांच्या मतदान कार्याची घेतली दखल

पिंपळगाव हरेश्वरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मूळचे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील कवी तथा पत्रकार प्रकाश तेली यांनी अल्पवयात मतदान जनजागृतीसाठी केलेल्या कार्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशंसा केली आहे. तसे पत्र त्यांनी प्रकाश तेली यांना १८ ऑक्टोबरला दिले आहे.

प्रकाश तेली यांनी मतदान जनजागृतीसाठी ४०० पेक्षा जास्त घोषवाक्य व १५०च्या जवळपास कविता लिहिलेल्या आहेत. हे एक सामाजिक व राष्ट्रीय कार्य असून समाजाला दिशा व मार्गदर्शन करणारे आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. प्रकाश तेली यांनी चांगल्या प्रकारे मतदार साक्षरता अभियान चालवल्याचे ही पत्रात नमूद आहे.

प्रकाश तेली यांनी कविता संग्रह आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जे कार्य केले आहे ते अद्भुत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या व्यतिरिक्त बालविवाह, सडक सुरक्षा, बालकांचे हक्क, वाढती लोकसंख्या अशा अनेक ज्वलंत विषयांवर जवळपास त्यांचे ५० कविता संग्रह आहेत. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रिय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पर्यटन मंत्री प्रभात लोढा, ज्ञानपीठ पुरस्कार वजिेते तथा ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री भालचंद्र नेमाडे अशा अनेक मान्यवरांनी त्यांच्या या सामाजिक कार्याची स्तुती करून त्यांचे काैतुक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...