आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्तारोको:पारोळ्यात 10 मिनिटे रोखला महामार्ग ; काळ्या फिती लावून केंद्र शासनाचा नोंदवला निषेध

पारोळा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईस विरोध करत, केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी, मंगळवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निषेध मोर्चा काढला काढला. तसेच १० मिनिटे महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने यांच्या नेतृत्वात कजगाव रोडवरून मोर्चाला प्रारंभ झाला. सुमारे १०० कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून केंद्र शासनाचा निषेध नोंदवला. तसेच प्रचंड घोषणाबाजी केली. महामार्गावरून हा मोर्चा पोलिस स्टेशन परिसरात आल्यावर रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांना निवेदन देण्यात आले. खासदार संजय राऊत यांच्या विरोधातील कारवाई ही हुकूमशाही पद्धतीची असल्याचा आरोप यावेळी जिल्हाप्रमुख डॉ.माने यांनी केला. यावेळी प्रा.आर.बी.पाटील, अण्णा चौधरी, रेवानंद ठाकूर, राजेंद्र चौधरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...