आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:आगीत बेघर झालेल्या कुटुंबाला तीन महिन्यांतच मिळाले नवे घर; बांधकाम साहित्याच्या स्वरूपात केली मदत

पारोळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील उतरूड येथे आदिवासी कुटुंबाच्या झोपडीला आग लागून संसारोपयोगी साहित्य व कोंबड्या जळून खाक झाल्याची घटना, १५ फेब्रुवारीला पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेत दुलसिंग सुक्राम भील यांचे कुटुंब उघड्यावर आले होते. मात्र, चार महिन्यात दात्यांनी मदतीचा हात पुढे केल्याने, तीन महिन्यातच या कुटुंबाला पुन्हा हक्काचे घर मिळाले आहे. दात्यांनी या कुटुंबाला ७५ हजार रुपये रोख व कपडे, धान्य व बांधकाम साहित्याच्या रुपात मदत केली.

दुलसिंग भील यांनी स्वतःच्या शेतातील टेकडीवर बांधलेल्या झोपडीला १५ फेब्रुवारी रोजी पहाटे अचानक आग लागली होती. त्यामुळे झोपडीतील ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, यासह संसारोपयोगी साहित्य व रोख रक्कम, दागिने खाक झाले होते. तर दुलसिंग भिल यांच्या पत्नीलाही आगीची झळ पोहोचून त्या जखमी झाल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच उतरुड, हिरापूर ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य केले होते. त्यानंतरच्या काळात दात्यांनी मदत केल्याने, झोपडीच्या जागी आता टुमदार घर साकारले आहे.

हक्काचा निवारा... आगग्रस्त कुटुंबासाठी आदर्श शिक्षक स.ध.भावसार, नीरज गुजराथी, प्रसाद गुजराथी यांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले होते. त्यामुळे दात्यांनी या कुटुंबाला मदतीसाठी पुढाकार घेतला. रोख रकमेसह कपडे, भांडी, कपडे, धान्य, घरासाठी बांधकाम साहित्य अशा मदतीचा ओघ सुरू झाला. त्यामुळे अल्पावधीतच या कुटुंबाला पुन्हा हक्काचा निवारा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...