आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान शांततेत पार:टाकळीत हुल्लडबाजांना दिला चोप

जामनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान पार पडले. टाकळी येथील मतदान केंद्रावर हुल्लडबाजांना पोलिसांनी चोप दिला. चिलगाव ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित १२ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडले. हिंगणे बुद्रूक येथे माजी सरपंच अनिल चौधरी यांच्या डोक्याला पिस्तूल लावण्याच्या प्रकारामुळे पोलिस सतर्क होते.

तर मोहाडी ग्रामपंचायत निवडणुकीत गुजरातचे खासदार तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील या निवडणूक लढवत असल्याने, तेथील निवडणूक प्रतिष्ठेची होती. १२ ग्रामपंचायतींसाठी रविवारी ८६ तक्के मतदान झाले. टाकळी येथे सर्वाधिक ९२ टक्के, मोहाडी येथे ८६ टक्के मतदानाची नोंद झाली.

जामनेर तालुक्यातील या ग्रामपंचायतींचा समावेश
मोहाडी, हिंगणे बुद्रूक, चिंचखेडा, पळासखेडा बुद्रूक, खादगाव, सोनारी, मालदाभाडी, दाभाडी, टाकळी बुद्रूक, करमाळ, कोदोली-पिंपरखेडा व रांजणी या १२ ग्रामपंचायतींचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...