आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:गोद्री शिवारातील घटना, साहित्य सोडून तस्कर पसार, घटनेने भीती वाढली

तळेगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर तालुक्याचे शेवटच्या टोकास गोद्री शिवारात चंदनाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. या प्रकाराला अटकाव करणाऱ्या शेतकऱ्यावर गोद्री शिवारात ८ रोजी मध्यरात्री हल्ला झाला.

गोद्री येथील शेतकरी जगन कोळी हे रात्री शेतात पंप सुरु करण्यासाठी गेले होते. शेताच्या बांधावर नैसर्गिकरीत्या वाढलेले २० फुट उंचीचे चंदनाचे झाड, तस्कर कापत असल्याचा त्यांना आवाज आला. कोळी यांनी तस्करांवर टॉर्चचा प्रकाशझोत टाकला. त्यावेळी तस्करांनी त्यांच्यावर दगडगोट्यांचा मारा सुरू केला. या घटनेत त्यांना मुका मार बसला. जखमी शेतकऱ्याने दोन तस्करांना ओळखले आहे. त्यामुळे तस्करांनी कापलेले चंदनाचे झाड व करवत सोडून पळ काढला. याप्रकरणी फत्तेपूर औट पोस्टला तक्रार नोंदवली आहे. फत्तेपूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.

सुगंध जाणून घेण्यासाठी ड्रीलने पाडले होते छिद्र
चंदनाच्या झाडाचा सुगंध जाणून घेण्यासाठी तस्कारांनी काही दिवसांपूर्वी खोडाला ड्रील मशीनने एक छिद्र पाडले होते. ते छिद्र शेतकरी कोळी यांनी पाहिले होते. मात्र, हे काम चंदन तस्करांचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले नव्हते. चंदन लाकडाची खात्री केल्यानंतर रात्री तस्कर आले होते.

बातम्या आणखी आहेत...