आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशाेत्सव:पाचोऱ्यात साकारली काशी येथीलविश्वेश्वर नाथ मंदिराची भव्य आरास ; श्रद्धाळू भाविकांमध्ये प्रचंड आकर्षण

पाचोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या गणेशोत्सवात मोक्ष भूमी असलेल्या काशीच्या विश्वेश्वर मंदिराची प्रतिकृती शहरात साकारण्यात आली असून बंगाली कारागिरांच्या अथक परिश्रमातून आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांच्या कल्पकतेतून ही आरास तयार करण्यात आली. येथे दर्शन घेऊन काशी केल्याचे आत्मिक समाधान लाभणार असल्याने भाविकांचे आकर्षण वाढले आहे.

मानसिंगका मिलच्या प्रांगणात आमदार किशोर पाटील यांच्या प्रेरणेने सुमित पाटील यांनी काशीच्या विश्वेश्वर नाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेत त्यासाठी बंगाली कारागिरांची मदत घेण्यात आली. गेल्या दीड महिन्यांपासून सूरज तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली २० बंगाली कारागिरांचा चमू या जगप्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती येथे साकारत हाेते.देशातील प्रत्येक नागरिकाला काशी या पुण्य भूमीत जावेसे वाटते. काशी केल्याने जीवनात मोक्ष मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. परंतु अनेकांना आर्थिक अथवा इतर कारणांमुळे काशी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आपणच पांडव व भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पाचोरा पुण्यभूमीत काशीच्या विश्वेश्वर नाथांच्या मंदिराची प्रतिकृती साकारावी या भूमिकेतून पाटील यांनी हा उपक्रम येथे राबवला आहे.

मुंबई व्यतिरिक्त विश्वेश्वर मंदिराचा असा भव्य देखावा उत्तर महाराष्ट्रात कुठेही नाही. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाविकांना काशी येथील विश्वेश्वर नाथांच्या दर्शनाची अनुभूती व्हावी व काशी तीर्थयात्रा केल्याची इच्छा पूर्ण व्हावी या हेतूने ही प्रतिकृती साकारली आहे. हजारो भाविकांना या निमित्ताने काशीचे दर्शन घडवण्याचे भाग्य मिळाल्याचा आनंद असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी हाेत आहे.

महिला-पुरुष भाविकांची दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था
गणेशोत्सवाच्या काळात दिवसभर हे मंदिर दर्शनासाठी खुले राहील. दर्शनासाठी महिला-पुरुष भाविकांकरिात स्वतंत्र व्यवस्था केली आहे. मानसिंगका मिलचा गणपती परिसरात या मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. भाविकांना आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...