आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 हजार पकडले:बँकेतून शेतकऱ्याचे 50 हजार रुपये हिसकावून पळणाऱ्याला पकडले

चाळीसगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकेेत खात्यातून पैसे काढल्यानंतर ते मोजत असताना, तेथे दबा धरून असलेल्या दोघा भामट्यांनी शेतकऱ्याकडून ५० हजार रुपये हिसकावले. घटनेनंतर बँकेबाहेर उभ्या केलेल्या दुचाकीवरून पळ काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने नागरीकांनी पळून जाणाऱ्या दोघांपैकी एकाला पकडले, तर दुसरा पसार झाला. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ही खळबळजळन घटना स्टेशन रोडवरील, बँक ऑफ बडोदाच्या शाखेत घडली.

शहरातील शिवदर्शन नगरमधील रहिवासी (ह.मु.सार्वे, ता.पाचोरा) शेतकरी दिलीप ताराचंद पाटील हे शेतीकामासाठी पैसे लागत असल्याने, शुक्रवारी सकाळी बँक ऑफ बडोदा शाखेत पैसे काढण्यासाठी आले होते. पाटील यांनी एक लाख रूपये काढले.

खिशातून रोकड फेकली
दोघे भामटे बँकेबाहेर लावलेल्या (एमएच.०४ जेवाय.७१३५) या शाईन दुचाकीवर बसून पळुन जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यापैकी एक भामटा नागरीकांच्या हाती लागला. तर दुचाकीवर पसार झाला. पळून जाणाऱ्या भामट्याने हिसकावलेली रोकड खिशातून खाली फेकली. घटनेनंतर वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी भामट्यास ताब्यात घेतले. चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...