आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदाज:आठवडाभरात किमान तापमान 13 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता

अमळनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्याभरात शहराचे किमान तापमान २२, तर कमाल तापमान ३५ अंशांवर होते. मात्र गेल्या दोन दिवसांत तापमानात सरासरी तीन अंशांची घसरण झाली आहे. या आठवडाभरात किमान तापमान १३ ते १६ अंशांपर्यंत घसरू शकेल, असा अंदाज हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी वर्तवला.

शनिवारी शहराचे किमान तापमान २२ अंशांवरून १९ अंशांवर पोहोचले. कमाल तापमानात दोन ते तीन अंशांची घसरण होऊन ते ३३ अंशांपर्यंत आले. १३ ते २० नोव्हेंबर दरम्यान त्यात पुन्हा घट होईल. किमान तापमान १३ अंशांपर्यंत खाली येईल. तसेच कमाल तापमान ३२ अंशांदरम्यान राहिल. या काळात अवकाळी पावसाची शक्यता नाही.

बातम्या आणखी आहेत...