आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी कृषीरत्न पुरस्कार:जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी‎ ‘फर्टिगेशन’ तंत्रज्ञानाची आवश्यकता‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पिकांच्या वाढीसाठी आवश्यक‎ असलेल्या अन्नघटकांची‎ कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला‎ पाहिजे. पिकांना हाताने दिलेल्या‎ खतांद्वारे ५० टक्केच फायदा होतो,‎तर ‘फर्टिगेशन’ तंत्रज्ञानामुळे ९०‎ टक्क्यापर्यंत परिणामकता वाढविता‎ येते. त्यामुळे जमिनीची सुपीकता‎ वाढविण्यासाठी फर्टिगेशन तंत्रज्ञान‎ आवश्यक असल्याचे प्रतिपादन जैन‎ उद्योग समुहाचे उपाध्यक्ष डॉ. के. बी.‎ पाटील यांनी केले.‎ ‘दिव्य मराठी’च्या कृषीरत्न‎ पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते‎ बोलत होते.

जिल्ह्याचे पालकमंत्री‎ गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत‎ हे पुरस्कार वितरण करण्यात आले.‎ के. बी. पाटील म्हणाले की शेतीमध्ये‎ स्थैर्य येण्यासाठी अधिक‎ अचुकतेकडे जावे लागेल.‎ शेतकऱ्यांनी शेती करताना‎ पीकांबाबतच्या रोगराईसह सर्वच‎ नोंदी ठेवणे आवश्यक आहे.‎ वातावरण, बाजारभाव याप्रमाणे पुढे‎ पीकांवरील रोगराईचे अंदाज बांधता‎ आले पाहीजे, त्यासाठी नोंदी घेवून‎ अनुभव वाढवणे आवश्यक आहे.‎ गेल्या ३० वर्षात केळी क्षेत्रात काम‎ करीत असून केळीला फळाचा दर्जा‎ मिळणे ही सर्वात ऐतिहासिक बाब‎ असल्याचे सांगत त्यांनी पालकमंत्री‎ गुलाबराव पाटील यांना या‎ कामासाठी धन्यवाद दिले. या वेळी‎ पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांतून उमरे‎ (ता. एरंडोल) येथील शेतकरी‎ समाधान पाटील, अंतुर्ली (ता.‎ मुक्ताईनगर) येथील दिनेश पाटील,‎ तांदळवाडी (ता. रावेर) येथील‎ शशांक पाटील यांनी मनोगत व्यक्त‎ केले.

वैशाली पाटील यांनी‎ सुत्रसंचालन केले तर दिव्य मराठीचे‎ युनिट हेड संजीव पाटील यांनी‎ आभार मानले. शेतकऱ्यांची‎ कार्यक्रमास मोठी उपस्थिती होती.‎ या शेतकऱ्यांचा झाला गौरव‎ मल्हार कुंभार (चोरवड, ता. पारोळा), भागवत महाजन (गोरगावले, ता. चोपडा),संजय ‎देशमुख (पहुर, ता. जामनेर),‎ कमलेश पाटील (बाहुटे, ता.‎ पारोळा), अतुल राणे‎ (कुंभारखेडा, ता. रावेर), संघरत्न गायकवाड (विखरण, ता.‎ एरंडोल), दिनेश पाटील (अंतुर्ली,‎ ता. मुक्ताईनगर), ज्ञानेश्वर पाटील (गहूखेडा, ता. रावेर), गणेश‎ पाटील (चोरवड, ता. पारोळा), नवनीत पाटील (तालखेडा, ता. मुक्ताईनगर), संदीप पाटील (पारोळा), संदीप माळी‎ (मोरफळ, ता. पारोळा), वैशाली पाटील, (दसनुर, ता. रावेर),‎ सचिन चौधरी (निंभोरा, ता.‎ रावेर), अविनाश पाटील‎ (हनुमंतखेडे, ता. पारोळा),‎ मदनसिंग राजपूत (सावदे, ता.‎ भडगाव), भूषण निकम‎ (उंदीरखेडे, ता.पारोळा),कन्हैय्या‎ महाजन (तांदळवाडी, ता. रावेर),‎ नीलेश पाटील (निंबोल, ता.‎ रावेर), राजेंद्र शिरसाठ (आव्हाणे,‎ ता. जळगाव), भावेश चौधरी‎ (फैजपूर, ता. यावल), शशांक‎ पाटील (तांदळवाडी, ता. रावेर),‎ नामदेव महाजन (नगरदेवळा, ता.‎ पाचोरा), नितीन चौधरी (भालोद,‎ ता. यावल), नीखिल पाटील‎ (कुंभारखेडा, ता. रावेर),‎ समाधान पाटील (उमरे, ता.‎ एरंडोल), अंबर चौधरी‎ (तांदळवाडी, ता. रावेर), दीपक‎ पाटील (गोरगावले, ता चोपडा). कृषिरत्न पुरस्कारार्थींसमवेत पालकमंत्री गुलाबराव पाटील, जैन इरिगेशन सिस्टिमचे डॉ. के.बी. पाटील, वरिष्ठ‎ शास्त्रज्ञ अनिल ढाके, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे प्रमुख गौतम देसरडा, प्लॅन्टो कृषीतंत्र , पलशर बायो प्रॉडक्टचे संचालक‎ निखिल चौधरी आदी.‎

बातम्या आणखी आहेत...