आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती:पंचायत समिती समोरील खड्ड्याची केली डागडुजी ; चाेपडा शहरात मनसेने केले होते आंदोलन

चोपडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पंचायत समितीसमोर असलेल्या खड्ड्यात कांॅक्रिट आेतून या ठिकाणी असलेल्या खड्ड्याची पालिकेकडून डागडुजी करण्यात आली. या संदर्भात मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पालिकेने ही कारवाई केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती व्हावी म्हणून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या १५ दिवसापासून आवाज उठवला हाेता.

त्यानंतर आज शहरातील पंचायत समितीसमोरील मोठ्या खड्डा खोदून तो अखेर सिमेंट काँक्रिटीकरण करून हा रस्ता दुरुस्त करण्यात आला. या संदर्भात मनसेने केलेल्या आंदोलनाचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने १३ ऑगस्टला प्रकाशित केले हाेते. त्यानंतर आज पालिकेने तो खड्डा बुजण्याचे काम ठेकेदार अनिल कदम यांना देऊन सायंकाळी हा खड्डा बुजवण्याचे काम पूर्ण केलहे. याबद्दल मनसेचे शहराध्यक्ष नीलेश बारी यांनी समाधान व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...