आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयाच्या आवारात लावलेल्या आमदारांच्या बॅनर वरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलाच पोरखेळ रंगला हाेता. दरम्यान, भाजपने हे बॅनर काढले तर राष्ट्रवादीतर्फे हे बॅनर पुन्हा लावण्यात आले. तर प्राचार्य आणि चेअरमन बाहेरगावी गेल्याने मात्र याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनिल पाटील यांच्या योगदानातून राज्यस्तरीय आमदार चषक स्पर्धा प्रताप महाविद्यालयात भरवण्यात आली आहे. याठिकाणी आयोजकांनी प्रवेशद्वारावर आमदार अनिल पाटील यांचा फोटो असलेले बॅनर लावले होते. त्यानंतर भाजपचे शिवाजी राजपूत, राहुल चौधरी, साहिल वारुळे, सागर धनगर, निनाद जोशी, कल्पेश पाटील, कल्पेश कुलकर्णी, हर्षल नरेंद्रसिंग, ललित पाटील, अमोल पाटील यांनी प्राचार्यांना निवेदन देऊन महाविद्यालयाच्या आवारात राजकीय पक्षाचे व व्यक्तीचे बॅनर लावून विद्यार्थ्यांच्या मनात प्रचार-प्रसार करण्याचा उद्देश आहे, असे म्हणत घोषणाबाजी सुरू केली. तर काही कार्यकर्त्यांनी आमदारांचे बॅनर काढून टाकले. त्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रताप महाविद्यालयात आले. त्यांनी देखील घोषणाबाजी करत पुन्हा आमदारांचे हे बॅनर उभे केले. दरम्यान, या बॅनरच्या पाेरखेळवरुन मात्र प्रताप महाविद्यालयाच्या परिसरात मात्र दिवसभर चर्चांना उधान आले हाेते.
या प्रकाराची माहिती नाही
मी नाशिक येथे महत्वाच्या बैठकीला आलो आहे. त्यामुळे तेथील प्रकाराबाबत माहित नाही. महाविद्यालयाचे मैदान संचालकांनी स्पर्धेसाठी दिले आहे.- पी. आर. शिरोडे, प्राचार्य, प्रताप महाविद्यालय, अमळनेर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.