आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढऱ्या सोन्याची खरेदी:चाळीसगावात कापसाला 11  हजार 51 रूपये भाव

चाळीसगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याची खरेदी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सुरु झाली. कपाशीच्या काटापूजनला ११ हजार ५१ रुपये प्रतिक्विंटला भाव मिळाला.उंबरखेड येथील शेतकरी संजय गायकवाड यांनी मुहूर्तावर ५० किलो कपाशी ११ हजार ५१ रुपये भावाने मोजून दिली. यावेळी व्यापारी सुधाकर गोल्हार, प्रशांत गोल्हार, वसंत गोल्हार, सचिन गोल्हार, विजय कोतकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

अलिकडच्या काही वर्षांत कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळी, ओला दुष्काळ आणि नापिकीच्या फेऱ्यात अडकले होते. मात्र यंदा कपाशीला मिळणाऱ्या दरांमुळे शेतकऱ्यांसाठी आश्वासक चित्र निर्माण झाले आहे. बाजारात आता कपाशीची आवक सुरू होण्यास सुरुवात झाली असली, तरी दिवाळीत आवक वाढेल.

बातम्या आणखी आहेत...