आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काटकसर:अमळनेर पालिकेचे पंपिंग स्टेशन सौर ऊर्जेवर चालणार

अमळनेर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गुजरात महिला हौसिंग सेवा ट्रस्टच्या पुढाकाराने झोपडपट्टी भागात, गेल्या दोन वर्षात १६३६ शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. त्यात जनजागृती करून शासकीय अनुदानाचा लाभ मिळवत, लाभार्थ्यांचा हिस्सा टाकून शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. सोबतच अंबर्शी महाराज टेकडीवर पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आणि वॉटर पंपिंग स्टेशनसाठी, ४५ किलोवॅट क्षमतेचा २२ लाखांचा सोलर प्रकल्प संस्थेच्या पुढाकारातून उभारला आहे. त्यामुळे पालिकेच्या पंपिंग स्टेशनला महावितरणची विज वापरण्याची गरज भासणार नाही. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.

वैयक्तिक शौचालय उभारणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर उर्जेचा वापर या बाबत संस्था जनजागृती करत आहेत. गोरगरीब कुटुंबातील महिलांना यामुळे सुविधा मिळत आहे. सोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबतही संस्थेतर्फे जनजागृती केली जात आहे. संस्थेच्या महाराष्ट्र संचालिका बिजेल ब्रह्मभट व प्रकल्प व्यवस्थापक म्हणून भारती भोसले काम पाहतात. अमळनेरात गीता पोतले, योगिता मालुसरे, भारती दाभाडे, स्मिता कोचळे, दीपाली भोईटे, संध्या मराठे, आशा पाटील, भारती सोनवणे, रुपाली सोनवणे, रुपाली शिंदे, रुपाली लाड, ललिता वायकर जनजागृती करत आहेत.

महिलांचे सक्षमीकरण
अमळनेर शहरात ११ भागात झोपडपट्टी आहे. या भागात अनेक महिलांना व त्यांच्या कुटुंबांना मदतीचा हातभार लावत, संस्थेच्या पुढाकारातून १६३६ शौचालये तयार केली आहेत. यातून स्वच्छता अभियानाला मोठा हातभार लागला आहे. सीएसआरच्या माध्यमातून ही संस्था महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकल्प राबवते.

रेन वॉटर हार्वेस्टिंग... शहरातील १७ विहिरींमध्ये आजूबाजूच्या घरांवरील छतावरचे पाणी उतरवण्यासाठी, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे भूजलपातळी वाढवण्यास मदत होत आहे. त्यामुळे अनेक भागातील टंचाई दूर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...