आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामकाज गतिमान:रेकॉर्ड रूमला लागणार शिस्त, नागरिकांच्या फेऱ्या वाचणार; पंचायत समितीतून 3 ट्रक भंगार काढले, आता काम तासाभरात

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पंचायत समितीच्या रेकॉर्ड रूममध्ये २० ते २५ वर्षांपूर्वीची अनेक कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेली आहेत. त्यामुळे वेळेवर दस्तावेज सापडत नाहीत. त्यामुळे कामकाज रखडते तसेच नागरिकांना वारंवार पंचायत समितीत फेऱ्या माराव्या लागतात. मात्र, नागरिकांची गैरसोय टळावी, आठ ते दहा दिवसांत होणारे काम तासाभरात व्हावे, हवा तो कागद सहज उपलब्ध व्हावा, यासाठी ‘झिरो पेंडन्सी अँण्ड डेली डिस्पोजल’ उपक्रम सुरु आहे.

प्रशासकीय कामाला होणारा विलंब टळावा, प्रकरणांचा निपटारा तातडीने व्हावा, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे पंचायत समितीच्या कामकाजात सुसूत्रता येणार आहे. प्रशासक म्हणून पदभार घेतल्यानंतर, बीडीओ नंदकुमार वाळेकर यांनी पहिल्याच दिवसापासून याची अंमलबजावणी सुरू केली आहे.

विविधरंगी कापडाच्या गठ्ठ्यांमुळे सुसूत्रता
पंचायत समितीतील अभिलेख कक्षात १५ विभागांचे रेकॉर्ड आहे. या कक्षात चार रंगांच्या कपड्यांमध्ये फाइल्स बांधून ठेवल्या आहेत. लाल कापड्यातील फाइल्स अ वर्गातील असून त्या कायमस्वरूपी जतन करून ठेवल्या जातील. हिरव्या कपड्यांमध्ये बांधलेल्या फाइल्स ब वर्गातील असून त्या ३० वर्षापर्यंत सांभाळून ठेवल्या जातील. पिवळ्या कपड्यात बांधलेल्या फाइल्स क वर्गातील असून १० वर्ष सांभाळल्या जातील.

झिरो पेंडन्सीमुशे नागरिकांची कामे आता वेगवान पद्धतीने होतील. फाइल्स शोधण्यासाठी यापूर्वी आठ ते पंधरा दिवस लागत होते, परंतु आता पाच मिनिटांत फाइल सापडावी, असे काम करण्याचे नियोजन आहे. दररोज आठ ते दहा कर्मचारी काम करीत असून त्यासाठी चार टीम दररोज दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत काम करत आहेत.

पाच मिनिटांत हवी ती फाईल सापडेल
चाळीसगाव येथील समितीच्या रेकॉर्ड रूमची पाहणी करताना गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, माजी सभापती अजय पाटील व कर्मचारी.नंदकुमार वाळेकर, बीडीओ, चाळीसगाव

  • रेकॉर्ड रूममध्ये आधुनिक कॉम्पेक्टरमध्ये चार प्रकारच्या फायली आहेत. त्यात अभिलेख अ, ब, क आणि क- १ या प्रकारांचा समावेश आहे. अभिलेख कक्षात एकूण १२ हजार ४६३ फाइल्स आहेत. रेकॉर्ड रूम अपडेट झाल्यावर तेथून तीन महिन्यात साधारण दोन ट्रक रद्दी काढली जाईल.
  • पंचायत समितीच्या सर्व विभागातून कागदपत्रे व साहित्याची छाननी करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास तीन ट्रक भंगार काढण्यात आले आहे. त्याचा सार्वजनिक लिलाव करण्यात येणार आहे.

कागदपत्रांची वर्गवारी
पंचायत समितीत शिक्षण, अर्थ, बांधकाम, आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, लघु पाटबंधारे, सामान्य प्रशासन, एकात्मिक बाल विकास, पशुसंवर्धन, कृषी, नरेगा, स्वच्छ भारत मिशन, घरकुल कक्ष, ग्रामपंचायत आदी १५ विभागातील अधिकारी व कर्मचारी मिळून कामकाज करतात. आतापर्यंत १५ दिवसात जवळपास २०० फाइल्स तपासून त्यांची विभागणी केली आहे. त्यात प्रलंबित प्रकरणे, प्रतिक्षाधीन प्रकरणे, नियतकालिके, स्थायी आदेश संचिका, अभिलेख कक्षात पाठविण्याची प्रकरणे नष्ट करावयाची कागदपत्रे अशी वर्गवारी केल जात आहे.

बातम्या आणखी आहेत...