आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुटले:चहार्डीत दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह ; बालकाने लस घेतल्याची माहिती मिळू शकली नाही

चोपडा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चहार्डी येथील दोन जणांता अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला. दोन्ही रुग्णांना ताप, सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे होती. म्हणून चहार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दोन्ही बाधितांमध्ये १३ वर्षीय मुलगा व २९ वर्षीय पुरुष असल्याची माहिती डॉ.प्रदीप लासूरकर यांनी दिली आहे. त्यापैकी पुरूषाने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर बालकाने लस घेतल्याची माहिती मिळू शकली नाही. चोपडा तालुक्यात सध्या चहार्डी येथील चार व चोपड्यातील एक असे पाच अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पाचही रुग्णांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी चाचणी करून घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...