आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मेजर कॉर्नरजवळी रस्ता अनेक दिवसांपासून खड्डेमय झाला होता. अखेर नगरपलिका प्रशासाने या रस्त्याचे क्रॉँकटीकरणाचे काम हाती घेतले आहे. आज दि.७ पासून या कामाला सुरूवात होणार आहे. ८ जानेवारीपर्यंत पुढील महिनाभर हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या मुख्य मार्गावरील वाहतूक ३० दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी दिली. त्यामुळे वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हॉटेल दयानंद ते खरजई नाकादरम्यान रस्त्याचे काम प्रलंबित होते. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. परिणामी पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून वाहनासोबत वाट काढण्याची कसरत देखील नागरिकांना करावी लागली.
पालिका प्रशासनाकडे वारंवार समस्या मांडूनही उपयोग होत नव्हता. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतः रस्त्यावर स्वखर्चाने मुरूम टाकून नागरिकांना होणार त्रास कमी केला होता. या समस्येची दखल घेत पालिकेने अखेर काँक्रिटीकरणाला प्रारंभ केला आहे. त्यामुळे खड्ड्यांची समस्या सुटणार आहे.
पर्यायी मार्ग असे
1 छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून (सिग्रल पॉईंट) घाट रोड, नागद चौफुलीकडे जाणारी वाहने हॉटेल आर्योपहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून घाट रोड, हॉटेल सदानंदमार्गे जातील.
2 कन्नड रोड बायपासकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे (सिग्रल पॉईंट) येणारी वाहने नागद रोड चौफुली, राजमाता आहिल्यादेवी चौकातून रिंगरोड, इच्छादेवी रोडने तिरंगा पुलाकडून, हिरापूर रोडवर जातील.
3 चाळीसगावकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या व येणाऱ्या बसेस, खासगी ट्रॅव्हल्सने छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून हिरापूर रोडने खडकी बायपास मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
खड्डेमय मार्गाची स्थिती खालावली
या रस्त्यावरूनच अवजड वाहने मार्गस्थ होतात. वाळूचे डंपर, ऊसाची वाहतूक करणारे ट्रक, तसेच इतर अवजड वाहनांचा या मार्गावर राबता होता. त्यामुळे आधीच खड्डेमय असलेल्या मार्गाची स्थिती आणखी खालावली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.