आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील पोलिस अधिकारी, अंमलदार, रॅपिड अॅक्शन फोर्स व जळगाव येथील आरसीपीतर्फे शहरातील संमिश्र वस्तीतून रूट मार्च काढण्यात आला. आगामी काळातील सण व उत्सव लक्षात घेता पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या हेतूने आज पथसंचलन करण्यात आले. पोलिसांचा हा रूट मार्च पोलिस कवायत मतदानापासून सुरु झाल्यानंतर वेगवेगळ्या भागातून गांधलीपूरा पोलिस चौकीत आल्यानंतर पथसंचलनाची सांगता झाली.
या पथसंचलनात डीवायएसपी राकेश जाधव, रॅपिड अॅक्शन फोर्सच डेप्युटी कमांडंट शशिकांत राय, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय शिंदे, आरएएफचे निरीक्षक संतोषकुमार यादव, निरीक्षक राजकुमार सिंग, निरीक्षक बलकार सिंग, निरीक्षक अजयकुमार सिंग, मारवड पोलिस ठाण्याचे सपोनि जयेश खलाने, उपनिरीक्षक नरसिंह वाघ, पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, उपनिरीक्षक विकास शिरोडे तसेच अमळनेर पोलिस ठाण्यातील ४५ अंमलदार, अारपीएफचे ७० पुरुष कमांडो व ५ महिला कमांडो अशा ७५ जणांच्या तुकडीचा सहभाग हाेता. यास संजय पाटील, डॉ. शरद पाटील, दीपक माळी, रवी पाटील, सिद्धार्थ शिसोदे, मधुकर पाटील यांनी सहकार्य केले बैठकीत शांतता राखण्याचे अावाहन रूट मार्चनंतर गांधलीपूरा पोलिस चौकीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात अाली. यात डीवायएसपी राकेश जाधव, डेप्युटी कमांडंट शशिकांत राय, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी आगामी काळातील सण-उत्सव काळात शांतता ठेवावी, असे अावाहन केले. या बैठकीस शांतता कमेटी सदस्यांसह माजी नगरसेवक हजर होते. गोपनीय शाखेचे डॉ. शरद पाटील यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.