आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध:एरंडोल विकासोची निवड प्रक्रिया झाली बिनविरोध

एरंडोल21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सर्वात मोठी सहकारी संस्था असलेल्या एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली.

सोसायटीच्या संचालकपदाच्या निवडणुकीत २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. माघारीच्या शेवटच्या दिवशी १२ जणांनी माघार घेतल्यामुळे ११ संचालकांची बिनविरोध निवड झाली. अनुसूचित जाती-जमाती व भटक्या जमाती गटातील उमेदवारांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली बिनविरोध निवड झालेले विकासो संचालक पुढीलप्रमाणे- कर्जदार खातेदार प्रतिनिधी-दुर्गादास राजाराम महाजन, योगराज भाऊलाल महाजन, विजय पंढरीनाथ महाजन, नितीन सदाशिव महाजन, राजेंद्र दोधू चौधरी, राजधर संतोष महाजन, ईश्वर नारायण पाटील, पंडित लाकडू पाटील, इमाव प्रतिनिधी-रवींद्र शांताराम महाजन, अनुसूचित जाती जमाती/भटक्या जमाती-वामन दौलत धनगर, रघुनाथ राजाराम ठाकूर, महिला राखीव-सुमनबाई हरचंद महाजन, निर्मलाबाई देविदास महाजन यांची निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...