आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:गाळप बंद करू नये; अन्यथा आंदोलन उभारू; निवेदनाद्वारे शेतकरी संघटनेने दिला इशारा

चोपडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा येथील साखर कारखान्याच्या परिक्षेत्रातील शेवटचा ऊस तुटेपर्यंत गाळप बंद करु नये, अन्यथा आंदाेलन छेडू, असा कारखान्याच्या अधिकाऱ्यांना शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.

बारामती ॲग्रोचे उपाध्यक्षांनी गुळवे व माचला येथील बैठकीत ३१ मार्चपर्यंत चोपडा तालुक्यातील ऊस शिल्लक ठेवणार नाही, असा शब्द दिला होता. मात्र १२ मे पर्यंत तालुक्यात २०० एकर पेक्षा जास्त ऊस शिल्लक राहिलेला असताना १३ मे पासून कारखाना प्रशासनाने उसाचे गाळप बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा अन्यायकारक निर्णय असल्यामुळे शेवटचा ऊस तुटेपर्यंत गाळप सुरू ठेवावे.

ऊस शिल्लक ठेवल्यास शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असे निवेदन बारामती ॲग्रोचे कृषी अधिकारी देसले यांना शेतकरी संघटनेने सादर केले आहे. निवेदन देताना शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील, तालुकाध्यक्ष सचिन शिंपी, तालुका सरचिटणीस विनोद धनगर, शहरप्रमुख अजित पाटील, महिला आघाडी प्रमुख कविता पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...