आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिंपळगाव चौखांबे येथील ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अनधिकृतपणे स्थापना केली होती. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या सूचनेनंतर ग्रामस्थांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा हलवण्याचा शुक्रवारी निर्णय घेतला. त्यानंतर हा पुतळा हलवण्यात आला. फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव चौखांबे येथील वाढीव वस्ती परिसरात ग्रामस्थांनी प्रशासनाची परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना केली होती. फत्तेपूर ते धामणगाव या मुख्य रस्त्यालगतच असलेला हा छत्रपती शिवरायांचा पुतळा तत्काळ काढून घ्यावा, अशा सूचना पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी फत्तेपूर आऊट पोस्टला घेतलेल्या बैठकीत केल्या होत्या.
दरम्यान, वाद विकोपाला जाऊ नयेत म्हणून ग्रामविकास तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, भाजपचे नेते जे. के. चव्हाण यांनी ग्रामस्थांची समजूत घालून शासनाची परवानगी घेऊन पुतळा स्थापन करावा, अशा सूचना केल्या. ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षक त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या सूचना मान्य करून हा पुतळा हलवून अन्यत्र स्थापन करण्याचा शुक्रवारी सायंकाळी निर्णय घेतला. त्यानंतर पाेलिसांच्या सूचनेनुसार हा पुतळा हलवण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थ व प्रशासनातील संघर्ष टळला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत हाेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.