आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीकडून दागिने जप्त:चोरलेल्या 29 लाखांच्या दागिन्यांचा लागला अवघ्या तीन दिवसांत छडा; आरोपीकडून सर्व दागिने पोलिसांनी केले जप्त

​​​​​​​चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मालेगाव रोडवरील विद्युत सरिता कॉलनीत ७ मे रोजी २९ लाखांचे ७३५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी कुठलाही पुरावा नसताना ३ दिवसांत चोरीचा छडा लावला. नात्यातीलच अल्पवयीन मुलीने हे दागिने घरातून काढून तिच्या मित्राकडे दिले होते. गणेश सुकलाल चौधरी (वय २५) असे त्याचे नाव आहे. त्यांच्याकडून सर्व दागिने जप्त करण्यात आले. राहुल अविनाश चौधरी यांच्याकडे २८ एप्रिलला वाढदिवसाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर त्यांची आई व पत्नीने दागिने काढून सुटकेसमध्ये ठेवले. ही सुटकेस बेडरूममधील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवली. त्याला कुलूप लावले नव्हते. ८ मे रोजी राहुल चौधरी यांच्या आईने सुटकेस उघडून पाहिल्यावर दागिने मिळाले नाही. २८ एप्रिलच्या रात्री १० ते ८ मे दरम्यान ही चोरी झाल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या चोरीत जवळील व्यक्तीचा समावेश आहे का? या दिशेने तपास केला.

अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक के. के. पाटील, एपीआय विशाल टकले व कर्मचाऱ्यांनी चौधरींच्या घरातील सर्वांची चौकशी केली. त्यात चौधरींच्या नात्यातील एका अल्पवयीन मुलीवर संशय बळावला. पोलिसांनी तिचा मोबाइल नंबर मिळवून कॉल ट्रेस केले. त्यात एका संशयिताचा नंबर आढळला. तो खरजई रस्त्यावरील गणेश चौधरीचा असल्याचे समोर आले. गणेश हा चौधरी यांच्या घरी ये-जा असणाऱ्या त्या अल्पवयीन मुलीचा मित्र आहे. चौकशीत कबुली देत गाडीच्या डिक्कीत ठेवलेले चोरीचे अर्धे दागिने काढून दिले. नंतर पुन्हा घरात ठेवलेले दागिने काढून दिले. त्याच्याकडून सर्व २९ लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...