आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निबंध स्पर्धा:तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत देवगाव देवळीच्या विद्यार्थिनींनी मिळवले यश; अंधश्रद्धा निर्मूलनविषयक तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली

पाडळसरे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे आझादी का अमृतमहोत्सवा अंतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती, आय.इ.सी.कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी आयोजित कुष्ठरोग निर्मूलन उपाययोजना व अंधश्रद्धा निर्मूलनविषयक तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात शाळेतील १५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत इयत्ता नववीतील हर्षला विनायक पाटीलने प्रथम, भाग्यश्री महेंद्र पाटीलने द्वितीय, स्नेहल भाऊसाहेब पाटीलने तृतीय क्रमांक मिळवला.

विजेत्या विद्यार्थिनींना सन्मानपत्र, प्रथम बक्षीस आठशे रुपये, द्वितीय पाचशे रुपये, तृतीय चारशे रुपये अशी रोख बक्षिसे देण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश गोसावी, वैद्यकीय कर्मचारी सुरेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील, मुख्याध्यापक अनिल महाजन, आय. आर महाजन, एस. के.महाजन, एच.ओ.माळी, अरविंद सोनटक्के यांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...