आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनी‎ गोल्फ स्पर्धेत रौप्य पदक:आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये जामनेर‎ येथील विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक‎

जामनेर‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील गी.द.म कला, के.रा.न वाणिज्य व‎ म.धा.विज्ञान महाविद्यालयातील‎ विद्यार्थ्यांनी सुरेश ज्ञानविहार विद्यापीठ,‎ जयपूर (राजस्थान) येथे, १ ते ५ मार्च‎ दरम्यान झालेल्या, आंतरविद्यापीठ मिनी‎ गोल्फ स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले.‎ महाविद्यालयातील विद्यार्थी जयेश जाट व‎ स्वाती गाढे यांनी हे यश प्राप्त केले.‎ गुरु काशी विद्यापीठ, भटिंडा (पंजाब) येथे‎ झालेल्या अखिल भारतीय पाॅवर लिफ्टिंग‎ स्पर्धेत, महाविद्यालयाचा विद्यार्थी दीपक‎ खैरे याने यश मिळवले. तर वैभव सोनवणे‎ याने मंगलोर (कर्नाटक) येथील येनेपोया‎ विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय‎ शरीरसौष्ठव स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश‎ करून पाचवे स्थान प्राप्त केले. विद्यार्थ्यांचे‎ संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, सचिव‎ जितेंद्र पाटील आणि सर्व संचालक मंडळ‎ सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य‎ डॉ.ए.आर. पाटील यांनी अभिनंदन केले.‎

बातम्या आणखी आहेत...