आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आठवड्यातील तापमान अन‌् आर्द्रतेतील अचानक बदलामुळेच श्वासनलिका, दम्याचा त्रास वाढला

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आठवड्याभरात वातावरणात झालेल्या वेगवान बदलाचा परिणाम आराेग्यावर हाेताे आहे. साेमवारी शहरातील हवेची गुणवत्ता (एअर क्वाॅलिटी इंडेक्स) १०१ हाेती. त्यात धूलिकणांचे प्रमाण शंभरच्या पातळीवर असताना तापमान आणि आर्द्रतेत माेठे बदल झाले आहेत. त्याचा परिणाम दम्याच्या रुग्णांसह लहान मुले, ज्येष्ठांवर हाेत आहे. सर्दी, खाेकला, नाक सुजणे, श्वासनलिकेचे त्रास वाढले आहेत.

तापमानातील चढउतार, कमी-अधिक हाेणारी आर्द्रता, वाऱ्याचा वेग, ढगाळ वातावरणाचा परिणाम म्हणून थंडीचे प्रमाण कमी-अधिक हाेत आहे. कधी उकाडा तर कधी कडाक्याच्या थंडीची अनुभूती येत असताना हवेची गुणवत्ताही सतत बदलते आहे. साेमवारी हवेचा एक्यूआय (एअर क्वाॅलिटी इंडेक्स) १०१च्या पातळीवर हाेता. त्यात धूलिकणांचे प्रमाणही प्रतिग्रॅम प्रति घनमीटर या युनिटमध्ये १०१च्या उच्चांकावर हाेते. हवेतील इतर वायूंचे प्रमाण सामान्य असले तरी धूलिकण, सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण मात्र धाेक्याच्या पातळीवर हाेते. त्याचा परिणाम आराेग्यावर दिसून आला. जसजशी थंडी वाढेल तसतसा हा त्रास अधिक वाढणार असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

तापमानात झाली घट साेमवारी किमान तापमान १३ अंश सेल्सिअस हाेते. गेल्या चार दिवसांत तापमानात आठ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. त्यामुळे थंडीत वाढ झालेली आहे. आर्द्रता वाढली आहे. पहाटेच्या वेळी धुके पडत आहे. सूर्याची प्रखरता घटली आहे. अतिनील किरणांचा इंडेक्स अवघ्या चारच्या पातळीवर आला आहे. तर वाऱ्याचा वेग ताशी आठ किलाेमीटरपर्यंत आहे.

बातम्या आणखी आहेत...