आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण:जैन समाजाबाबतचा सर्वेक्षण अहवाल चुकीचा, केंद्राने तो तातडीने मागे घ्यावा ; भुसावळातील सकल जैन समाजाने केली सरकारकडे मागणी

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाकडून राष्ट्रीय कुटूंब आरोग्य सर्वेक्षण - पाचचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात सकल जैन समाजातील काही लोक मांसाहार करतात, अशा चुकीच्या माहितीवर सर्वेक्षण करुन जैन धर्मीयांची बदनामी करण्यात आली आहे. यामुळे हे सर्वेक्षण तातडीने मागे घेवून जैन समाजाची बदनामी थांबवावी, अशी मागणी शहरातील सकल जैन समाजाने केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विश्व शांतिदूत भगवान महावीर यांनी अहिंसेचा संदेश दिला आहे. अहिंसा परमो धर्म, जिवो और जिने दो तथा शाकाहार सदाचार या तत्त्वाला मानणारा जैन समाज आहे. मात्र केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटूंब आरोग्य सर्वेक्षणात समाजाची बदनामी करण्यात आली आहे. समाज शाकाहाराचा पुरस्कर्ता हा अहवाल पूर्णपणे चुकीचा असून जैन समाज १०० टक्के शाकाहाराचा पुरस्कर्ता आहे. या चुकीच्या अहवालाचा निषेध करुन केंद्र शासनाने तो तातडीने मागे घ्यावा आणि देशभरातील सकल जैन समाजाची बदनामी थांबवावी, अशी मागणी सकल जैन समाजाचे सुगनचंद सुराणा, प्रेमचंद कोटेचा, माजी नगरसेवक निर्मल कोठारी, रवींद्र निमाणी, जे.बी. कोटेचा, प्रेमचंद चोपडा, शेखर जैन, अजय जैन, प्रकाश जैन, दीपक काटे, सुभाषचंद्र बजाज, गौतम चोरडीया, कांतीलाल चोरडीया, जयंतीलाल सुराणा, राजेश बाफना, बन्सीलाल चोरडीया, संजय चोरडीया, महेंद्र कोठारी, उज्ज्वल गेलडा, दीपक जैन आदींसह समाजबांधवांनी केली आहे. दरम्यान समाजात या सर्वेक्षणाबाबत चर्चा होत असून संताप व्यक्त होत आहे. हा अहवाल मागे घेण्याची मागणीही होत आहे.

बातम्या आणखी आहेत...