आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासन २०१८ ते २१ या तीन वर्षांसाठी पालिकेने सार्वजनिक शौचालय सफाई व देखभाल दुरुस्तीचे कंत्राट देताना नियमांचे उल्लंघन केले. कमी दराची निविदा डावलून जास्त दराच्या निविदा धारकाला काम दिल्याची तक्रार, माजी नगरसेविका संध्या महाजन यांनी केली होती. याप्रकरणी चार वर्षांनी अनियमिततेस जबाबदार अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होणार आहे, अशी माहिती महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील ९ सार्वजनिक शौचालये बांधल्यापासून पुढील ९ ते २० वर्षांसाठी कमी दराने सफाई व देखभालीचा करार केलेला होता. तसेच करारनाम्यात पाण्याची उपलब्धतता कंत्राटदाराने करणे आवश्यक असल्याची तरतूद होती. मात्र, चार वर्षे पालिकेचे बंब व टँकरमार्फत पाणीपुरवठा झाला. त्यामुळे वाहनांचा इंधनखर्च आणि मनुष्यबळ पालिकेचे वापरले गेले. ही अनियमितता माजी नगरसेविका महाजन यांनी निदर्शनास आणून दिली होती. तसेच ऑगस्ट २०१८ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती.
चार वर्षे पाठपुरावा २०१८ च्या तक्रारीबाबत २०२२ मध्ये कारवाईचे फक्त पत्राचे सोपस्कार जिल्हाधिकारी कार्यालयातील न.पा. शाखा करत आहे. केवळ तक्रार अर्ज स्वीकारून, अहवाल मागवून वेळकाढूपणा केल्याचा, दोषींवा वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप महाजन यांनी केला.
अर्ज प्रलंबित नाही माजी नगरसेविका संध्या महाजन यांच्या सर्व तक्रारींबाबत आमच्या स्तरावर निर्णय झालेला आहे. ज्या तक्रारी आमच्याकडे होत्या त्या निकाली काढल्या आहेत. तसेच काही वरिष्ठ स्तरावर पाठवलेल्या आहेत. एकही अर्ज प्रलंबित नाही जनार्दन पवार, सहा.आयुक्त न.पा.शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.