आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:लग्न आटोपून धुळ्याकडे जातानाकार ट्रकवर आदळली; शिक्षक ठार, कारमधील अन्य दोघे जखमी

एरंडोल25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

थांबलेल्या ट्रकला जळगाव येथून धुळ्याकडे भरधाव जाणाऱ्या मारुती वॅगनर कारने मागून धडक दिली. सोमवारी सायंकाळी ५ वाजता महामार्गावरील हॉटेल शिवानंद ढाब्यासमोर हा अपघात झाला. त्याच कारमधील जि.प.शिक्षक जागीच ठार झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. मृत व जखमी जळगावातील विवाह समारंभ आटोपून धुळ्याकडे जात होते. मात्र, वाटेतच अपघात झाला.

ट्रक (क्र-सी.जी.०४-जे.डी.०२८२) चालकाने हॉटेल शिवानंद समोर ट्रक जेवणासाठी थांबवला होता. त्याचवेळी मारुती वॅगनार कारने (क्र.एम.एच.२०-सी.एस.१३८४) ट्रकला मागील बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात चंद्रकांत नामदेव पाटील (रा. नगाव, ता.धुळे) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबत असलेले अशोक दगा तोरवणे (रा. नकाणे रोड, धुळे), आणि सतीश हेमचंद्र चौधरी (रा.बिजली कॉलनी, स्टेडियम जवळ, धुळे) हे दोघे जण गंभीर जखमी झाले. - उर्वरित पान ४.
मृत जि.प.शिक्षक
अपघातातील मृत चंद्रकांत पाटील शिंदखेडा तालुक्यात जि.प. शा‌ळेचे शिक्षक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.
अपघातात कारचा असा चक्काचूर झाला.
चंद्रकांत पाटील

बातम्या आणखी आहेत...