आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त:खडकदेवळा येथे निवृत्त बीएसएफ जवानाचे ग्रामस्थांनी केले स्वागत

पाचोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खडकदेवळा येथील रहिवासी प्रशांत बारकू पाटील हे सीमा सुरक्षा दला (बीएसएफ)मधून २० वर्षांच्या सेवेनंतर गावी परतले. ग्रामस्थांतर्फे त्यांचे मिरवणुकीद्वारे भव्य स्वागत करण्यात आले.

पाटील २० वर्ष २ महिने २१ दिवसांची सेवा पूर्ण करून ३१ अॉगस्टला मेघालय येथे सेवानिवृत्त झाले. येथे आल्यानंतर घाेषणा देत त्यांची रॅली येथून खडकदेवळ्याकडे रवाना झाली. गावात आईसह महिलांनी पाटील यांचे आैक्षण केले. नागरिकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, आमदार किशोर पाटील, पीटीसी चेअरमन संजय वाघ, भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, नितीन तावडे, धर्मराज सूर्यवंशी, डॉ.यशवंत पाटील, जय हिंद सैनिक संस्थेचे राज्य पदाधिकारी व सदस्य, संजय निकम, खडकदेवळ्याचे सरपंच प्रवीण निकम, विकासाेचे चेअरमन बी.एम. पाटील, आधार पाटील, पोलिस पाटील एकनाथ कोळी, ग्रा.पं. व विकासाेचे सदस्य आजी-माजी सैनिक, पोलिस मित्र व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...