आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथून जवळच असलेल्या बिडगाव येथील रहिवासी व आयटीबीपीचे जवान अशोक हिरामण पाटील (वय ३५) यांची प्रकृती खालावल्याने, त्यांच्यावर गुवाहाटीच्या सैनिक रुग्णालयात उपचार सुरु होते. दुर्दैवाने उपचार घेताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले. १४ ऑगस्टला गावातील मराठी शाळेत त्यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मस्ती केली अशी आठवण ग्रामस्थांनी सांगितली. तीच त्यांची गावातील शेवटची भेट ठरली.
जवानाच्या पार्थिवावर दि.८ रोजी सकाळी ११ वाजता बिडगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. बिडगाव येथील हिरामण झावरु पाटील यांचे एकुलते एक सुपूत्र अशोक पाटील हे अरुणाचल प्रदेश येथील युपीया येथे इंडीयन तिबेट बाॅर्डर फोर्स ३१ बटालियनमध्ये सेवेत होते. त्यांना गेल्या पाच दिवसांपुर्वी कर्तव्यावर असताना भोवळ येऊन पडल्याने त्यांना मेंदूला मार लागला होता.
गुवाहाटीच्या सैनिक रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतांना मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव गुवाहाटीहून विशेष विमानाने हावडा येथे व तेथून इंदूर व नंतर शववाहिकेने बिडगाव येथे आणले जाईल. जवान पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, तीन बहिणी असा परिवार आहे.
२००९मध्ये सैन्यात भरती
जवान अशोक पाटील हे सन २००९ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. दोन दिवसांपुर्वीच जवान पाटील यांच्या पत्नी व अन्य नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी गेले होते. दि.५ रोजी सकाळी केवळ खाणाखुणा करून त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रकृती खालावल्याने मंगळवारी पहाटे ५ वाजता त्यांचे निधन झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.