आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा प्रशासन:निवडणूक आयोगाने जाहीर केलेली प्रभाग रचनाच कायम; काम तातडीने हाती घेण्यास जिल्हा प्रशासनाला बजावले

चाळीसगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची संदिग्धता अखेर संपुष्टात आली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे काम तातडीने हाती घेण्यास जिल्हा प्रशासनाला बजावले आहे.

चाळीसगाव नगरपालिकेची यापूर्वी निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेली प्रभाग रचनाच कायम राहिल, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे यापूर्वी जाहीर झालेली प्रभाग रचना लक्षात घेऊन इच्छुक पुन्हा सक्रिय झाले आहेत. तर नवीन प्रभाग रचना होवून काही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असलेल्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.

चाळीसगाव नगरपालिकेची मुदत २९ डिसेंबरला संपली असून येथे सध्या मुख्याधिकारी हेच प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेली प्रभाग रचना २२ फेब्रुवारीला निवडणुक आयोगाने जाहीर केली होती. या आराखड्यात पालिकेत १ प्रभाग वाढला तर नगरसेवकांची संख्याही दोनने वाढल्याने प्रभागांची संख्या १७ वरून १८ तर नगरसेवकांची संख्याही ३४ वरून ३६ झाली होती.

बातम्या आणखी आहेत...