आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी योजनेचे भूमीपूजन:खडकी-बोरगावचा पाणीप्रश्न नवीन योजनेमुळे कायमस्वरुपी सुटणार

जामनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खडकी-बोरगाव या गावांसाठी जलजीवन मिशनअंतर्गत वाघूर धरणावरून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. योजनेचे भूमीपूजन गुरुवारी ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते झाले.खडकी व बोरगाव या गावांचा पाणीप्रश्न गंभीर बनला होता. वाघूर धरणात सामावणाऱ्या सूर नदीलगत ही गावे असली, तरी सूर धरणामुळे नदीचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे. नदी प्रवाही नसल्याने या गावांना अनेक दिवसापासून टंचाईचा प्रश्न भेडसावत होता.

यावर कायमचा तोडगा काढण्याची विनंती सरपंच किशोर नाईक यांनी केली होती. मंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेऊन, मंत्रालयातून खडकी-बोरगावसाठी वाघूर धरणावरून पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. गुरूवारी योजनेचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच किशोर नाईक, विलास पाटील, के.बी.पाटील, सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष राजमल भागवत, गारखेडा सरपंच माधव पाटील, अशोक पाटील, तुकडुदास नाईक, रामकिसन नाईक, उपसरपंच उदल नाईक, रतिलाल नाईक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...