आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
निवडणूक निकालानंतर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे येथे दोन गटात सोमवारी दुपारी तुफान हाणामारी झाली. त्यात तलवारी, कोयते, लाठ्याकाठ्यांचा वापर झाल्याने दोन्ही गटातील तिघे जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसांत तीन तक्रारींनुसार एकुण ३४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्यात परस्पर विरोधी फिर्यादीवरून भाजप नगरसेविकेच्या माजी नगरसेवक पतीसह एका गटातील २३, तर दुसऱ्या गटातील ५ जणांचा समावेश आहे. तिसरा गुन्हा अॅड.हर्षल पाटील यांनी ६ जणांविरुद्ध दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी २३ पैकी ९ जणांना अटक केली. मंगळवारी दिवसभर गावात तणावपूर्ण शांतता होती. खबरदारी म्हणून दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, डीवायएसपी कैलास गावडे, एपीआय पवन देसले यांनी घटनास्थळी भेट दिली.
वडगाव लांबे ग्रामपंचायत निवडणुकीत तक्रारदार प्रकाश नीळकंठ पाटील यांचे पॅनल विजयी झाले. या विजयी उमेदवारांचे गावकरी औक्षण करणार असल्याने ते सोमवारी (दि.१८) दुपारी ४.३० वाजता गल्लीतून जात हाेते. यावेळी आरोपींनी तलवार, लोखंडी रॉड व लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवला. प्रकाश पाटील व कोमलसिंग रामसिंग पाटील यांच्या डाेक्यावर तलवारीने वार करून गंभीर दुखापत केली. मारहाणीसह ठार मारण्याची धमकी, शिवीगाळ करत जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. अॅड. हर्षल पाटील यांच्या घरासमोर ही घटना घडली. या प्रकरणी प्रकाश नीळकंठ पाटील यांच्या तक्रारीवरून संतोष देवसिंग पाटील, विद्यमान भाजप नगरसेविका वैशाली पाटील यांचे पती सोमसिंग देवसिंग पाटील, योगेश मानसिंग पाटील, मंगलसिंग देवसिंग पाटील, मानसिंग देवसिंग पाटील, संजय देवसिंग पाटील, अमरसिंग मानसिंग पाटील, केतनसिंग भरतसिंग पाटील, भगवान भिमसिंग पाटील, सुमेरसिंग भिमसिंग पाटील, हेमंत विजयसिंग पाटील, नीलेश विजयसिंग पाटील, विजयसिंग वेडू पाटील, अरूण भिमसिंग पाटील, लखनसिंग बालू पाटील, कुणाल बिजेसिंग पाटील, महेंद्र अजयसिंग पाटील, महेश बिजेसिंग पाटील, रवींद्र बालू पाटील, भूषण भिकनसिंग पाटील, बिजेसिंग वेडू पाटील, अजयसिंग वेडू पाटील, देवराज मंगलसिंग पाटील अशा २३ जणांविरुद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
९ आरोपींना अटक; मात्र वकीलच मिळाले नाहीत, आज कोर्टात नेणार
या हल्ल्यात गंभीर जखमी कोमलसिंग पाटील यांना चाळीसगाव शहरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी २३ पैकी ९ जणांना अटक केली. त्यात हेमंत पाटील, माजी नगरसेवक सोमसिंग राजपूत, नीलेश पाटील, महेश पाटील, महेंद्र पाटील, सुमेरसिंग पाटील, भगवान पाटील, रवींद्र पाटील आणि अरुण पाटील अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, आरोपींना वकील न मिळाल्याने एक दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली. बुधवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करू, अशी माहिती एपीआय पवन देसलेंनी दिली. वकिलाच्या घरावर देखील हल्ला
निवडणुकीच्या वादातून अॅड. हर्षल सूरजसिंग पाटील (रा.वडगाव लांबे) यांच्या घरावर देखील हल्ला झाला. हल्लेखोरांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करून अॅड. पाटील यांचे वडील व पत्नीस धक्काबुक्की, शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अॅड. पाटील यांच्या तक्रारीवरून वजेसिंग पाटील, निंबा पाटील, योगेश पाटील, देवराज पाटील, अनिल पाटील, महेंद्र पाटील या ६ जणांविरुद्ध मेहुणबारेत गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार मिलिंद शिंदे हे करत आहेत. दरम्यान, या घटनेचा चाळीसगाव वकील संघाने निषेध करत हल्लेखोरांचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव केला. त्यामुळे मंगळवारी आधीच्या गुन्ह्यातील २३ पैकी अटकेतील ९ अाराेपींना वकील िमळाले नाही.
दुसऱ्या गटाची ५ जणांविरुद्ध तक्रार
दुसऱ्या गटाकडून मानसिंग देवसिंग राजपूत यांनी फिर्याद दिली. त्यात संशयित हे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले. यानंतर गावात मिरवणूक काढून पराभूत उमेदवार व तक्रारदार मानसिंग पाटील यांच्या घरासमोर मुद्दाम चिथावणीखोर घोषणा देवून फटाके फोडले. त्याचा जाब विचारल्यावर आरोपींनी मानसिंग पाटील यांच्या डाेक्यावर कोयत्याने वार केला. इतरांनाही शिवीगाळ, मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मानसिंग पाटील यांच्या घरासमोर घडली. याप्रकरणी प्रकाश नीळकंठ पाटील, वंदना सुजनसिंग पाटील, सुरेखा राजेंद्र पाटील, जयसिंग भरतसिंग पाटील, रवींद्र नीळकंठ पाटील यांचेवर गुन्हा दाखल झाला. तपास एपीआय पवन देसले करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.