आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचहार्डी येथे ग्रामपंचायतीची मासिक सभा सुरु असताना एका महिलेने राेंजदारीच्या कामावरुन कमी केल्याच्या कारणावरून ग्रामविकास अधिकारी यांची काॅलर पकडली तसेच त्यांना धक्काबुक्की करत मारहाण करण्याची धमकी दिली. या प्रकरणी चाेपडा शहर पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील चहार्डी येथे ३ राेजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायतीची मासिक सभा हाेती.
या वेळी कोमलबाई बापूराव पाटील यांनी मासिक सभेत येवून ग्रामविकास अधिकारी एस. आर. पारधी यांना रोजंदारी कामावरुन कमी केले व वृत्तपत्रात नाव आल्याने बदनामी झाली, या कारणावरून वाद घातला. तसेच ग्रामविकास अधिकारी पारधी यांच्या शर्टाची कॉलर पकडून धक्काबुक्की करत मारहाण करण्याची धमकी दिली.
या प्रकरणी शासकिय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कोमलबाई पाटील यांच्या विरुद्ध चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक घनश्याम तांबे करत आहेत. दरम्यान, कोमलबाई पाटील यांनी ग्रामपंचायतीत काम करताना परवानगी न घेता नमुना नं.८मध्ये नाेंद केल्याने त्यांना एका सभेत राेजंदारी कामावरुन कमी केले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.